कीलॉईड (Keloid)

लहानशा फोडामुळे कधीकधी छातीवर जाड व्रण तयार होतात.
हे व्रण वाढू लागतात तसेच फार त्रासदायक असतात. CABG शस्त्रक्रीयेनंतर सुद्धा असे व्रण होतात. ह्या व्रणांचे ऑपरेशन करत नसतात. ऑपरेशन ने हे व्रण अजून वाढतात. स्टीरॉईड (Steroid) चे इंजेक्शन योग्य प्रमाणात त्या व्रणात देणे हा एकमेव उपाय आहे. हे इंजेक्शन पहिल्या वेळी देतांना दुखते. कधी कधी ३-३ आठवड्यानंतर परत इंजेक्शन घ्यावे लागते. तेव्हा कमी दुखते. इंजेक्शन अगदी योग्य खोलीवर देणे आवश्यक असते त्यामुळे हे केवळ प्लास्टीक सर्जन किंवा त्वचारोग तज्ञाकडूनच घ्यावे. इंजेक्शन ने या व्रणातील त्रास कमी होतो व वाढ थांबते.
कधी कधी होमिओपॅथी औषधांमुळे या व्रणांना फायदा होवू शकतो.
कीलॉईड प्रमाणे दिसणारे काही दुसरे व्रण असतात. त्यांना मात्र प्लास्टीक सर्जरीने फायदा होतो.