स्किन ग्राफ्टिंग झालेल्या रुग्णांसाठी सूचना

स्किन ग्राफ्टिंग झालेल्या रुग्णांसाठी सूचना

१) त्वचारोपण झालेल्या त्वचेला नियमितपणे साध्या पाण्याने स्वच्छ करावे किंवा धुवावे.
२) लक्षात घ्या त्वचेला पाण्याची नितांत आवश्यकता असते. पाणी न लावल्यास ती त्वचा रुक्ष होते. त्यामुळे त्वचेला पाणी लावणे आवश्यक आहे.
३) पाण्याने धुतल्यानंतर त्वचा कोरडी करुन तिला तेल किंवा क्रीम लावावे.
४) त्वचारोपण झाल्यापासून तीन आठवड्यानंतर त्या त्वचेला नियमित मालीश सुरु करावी.
५) सांध्यावरती त्वचा रोपण झाले असल्यास तीन आठवड्यापर्यंत त्या सांध्याची अजिबात हालचाल करु नये. यासाठी प्लास्टर लावलेले असतेच. तीन आठवड्यानंतर सांध्याची पूर्ण हालचाल करता येते, परंतु रात्रीच्या वेळी सांधा परत प्लास्टर मध्ये ठेवावा. सांध्याजवळच्या त्वचा रोपणानंतर सांध्याची हालचाल योग्य होण्यासाठी व सांधा आक्रसू नये म्हणून अतिशय मन लावून व्यायाम करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास त्वचा रोपण शास्त्रक्रियेचा काहीही फायदा होत नाही.