हाताच्या ऑपरेशनमध्ये हात उंच ठेवण्याचे महत्व

हाताच्या ऑपरेशनमध्ये हात उंच ठेवण्याचे महत्व

बोटाचे किंवा हाताचे कुठलेही ऑपरेशन झाल्यानंतर हात उंच ठेवणे आवश्यक असते. यामुळे हाताला व बोटाला सूज येत नाही. हात खाली लटकवल्यास ऑपरेशन झालेल्या भागाला अतिशय सूज येते. ऑपरेशनचे टाके भरण्यासाठी हाताला सूज न येणे हे आवश्यक असते. चालता-फिरतांना पेशन्टने हात छाती किंवा पोटापाशी धरावा. झोपतांना हात भिंतीला टेकून ठेवावा.
हाताचे ऑपरेशन झालेल्या पेशन्टने एखादवेळी औषध घ्यायला विसरले तर चालू शकेल परंतु हात खाली केलेला चालणार नाही.
लहान मुलांना हत वर ठेवणे समजत नाही म्हणून त्यांना कोपराच्या वर पर्यंत प्लास्टर लावणे अत्यावश्यक असते