भाजणे टाळण्यासाठी सुरक्षिततेचे उपाय

भाजणे टाळण्यासाठी सुरक्षिततेचे उपाय

उकळते पाणी, चहा, तेल आणि इतर पातळ पदार्थ अंगावर सांडून होणाऱ्या दुर्घटना, फटाक्यामुळे होणारे burns आणि shock लागून होणाऱ्या बर्न्स काही काळजी घेतल्यास आणि नियम पाळल्यास नक्कीच टाळता येतात.

१. स्वयंपाक नेहमी ओट्यावरच करावा, ओटा नसल्यास बनवून घ्यावा, जमिनीवर स्वयंपाक करू नये.
२. उकळते पाणी, दुध, वरण, पाक, भाजी इत्यादी जमिनीवर कधीही ठेवू नये, मुले धावत येऊन त्यात पडण्याच्या घटना घडत असतात आणि त्या भयंकर असतात.
3. उकळते तेल किंवा पाक इत्यादी असलेली कढई अत्यंत सावधान राहून उचलावी. सांडशीची पकड निसटल्यामुळे कढई लवंडून उकळल्या तेलामुळे बऱ्याच गंभीर हजा होवू शकतात.
४.प्रेशर कुकरची वाफ जिरण्या आधी उघडण्याची घाई कधीही करु नये.
५. किचन मधून उकळत्या पाण्याचे पातेले बाथरुम कडे नेऊ नये. बाथरुम मधून बादली किचन मध्ये न्यावी आणि त्यात गरम पाणी सांभाळून ओतावे. तसेच ते बाथरूम कडे नेतांना घरातील सदस्यांना सावध करावे, जेणे करुन कोणी रस्त्यात येऊन धक्का लागणार नाही.
६. गरम चहा किंवा दूध घेऊन जाताना मुलांना सावध करावे. अन्यथा मुले धावत येऊन त्यांचा धक्का लागून चहा सांडण्याच्या घटना घडत असतात.
७. लहान मुलांना कधीही वाफ (स्टीम inhalation) देऊ नये. मोठ्यांनी स्टीम inhalation घेताना सावध रहावे. शक्य असल्यास वाफ घेण्याची मशीन वापरावी.
८. विजेच्या उपकरणांना पाण्याचा स्पर्श होवू नये.
९. उघड्या तारा असलेले, घरगुती बनावटीचे वॉटर हीटर इत्यादी वापरु नये.
१०. फटाके फोडताना मोठी व्यक्ति हजर असणे आवश्यक आहे.
११. फटाके मोकळ्या जागीच फोडावे. तिथे ज्वलनशील कोणतेही पदार्थ असू नये.
१२. पाण्याची बकेट उपलब्ध असावी.
१३. फटाका लावताना त्यापासून अंतर ठेवावे.
१४. सुती कपडे घालूनच फटाके फोडावे.
असे काही नियम कटाक्षाने पाळल्यास भाजण्याच्या दुर्घटना नक्कीच टळू शकतील.
भाजल्यावर त्या भागावर बराच वेळ पर्यंत पाणी टाकावे किंवा तो भाग पाण्यात बुडवून ठेवावा. हा एकमेव प्रथमोपचार अत्यंत मोलाचा आहे. ह्यामुळे त्वचेतील उष्णता बाहेर निघते आणि भाजल्याची जखम जास्त खोल होत नाही. लक्षात घ्यावे, भाजलेल्या भागाला तत्काळ थंड पाण्याची गरज असते, औषध, मलम, इत्यादी ची गरज नसते. कोल्ड थेरपी दिल्यावर मग रुग्णाला रुग्णाला प्लास्टिक सर्जन कडे न्यावे.