चेहरा, जबडा, नाक, गाल, ओठ याचे ऑपरेशन झालेल्या पेशंटच्या आहारासंबंधी सूचना

१) चेहऱ्याचे कुठलेही ऑपरेशन झालेल्या पेशंटला ७ दिवसापर्यंत नरम जेवण द्यावे. उदा. खिचडी, पोळीचा काला, ज्यामुळे पेशंटला चावावे लागणार नाही. चावण्यामुळे ऑपरेशनच्या जागेवर ताण पडतो.
२) तोंडाच्या आतमध्ये टाके लागलेल्या पेशंटला दोन दिवस फक्त दूध, वरणाचे पाणी, संत्रे, मोसंबी इत्यादीचा गाळलेला रस, नारळाचे पाणी, निंबूपाणी असा आहार द्यावा. तिसऱ्या दिवसापासून खिचडी, खीर, असा नरम व पातळ आहार द्यावा. ७ दिवसानंतर वरण, भात, भाजी, पोळी या सर्व गोष्टी कुस्करुन द्याव्यात. चिवडा, चकली आणि तळलेले कडक पदार्थ दोन महिने देऊ नये