प्लास्टीक सर्जरी ह्या शाखेचा उगम भारतातच १५०० वर्षापूर्वी झाला तरीही अजून या शाखेविषयी फारच कमी जागृती आढळून येते. Plasty (प्लास्टी) या शब्दाचा अर्थ रिपेअर करणे, सुंदर बनवणे, नीट आकार देणे, नष्ट झालेले असल्यास पुन्हा बनवणे असा होतो. म्हणून या शस्त्रक्रियांना प्लास्टीक Plastic सर्जरी म्हणतात. (प्लास्टीक मेटरियलचा या शस्त्रक्रियेशी काहीही संबंध नाही.) अतिशय नाजुकपणे, बारकाईने, कौशल्याने, सौंदर्याचा दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून ह्या शस्त्रक्रीया केल्या जातात.