Category: Blog

AV FISTULA

 हे ऑपरेशन Artery (शुद्ध रक्तवाहिनी) आणि Vein (अशुद्ध रक्तवाहिनी ह्यांना सुक्ष्मशस्त्रक्रीयेने (miscrosurgery) जोडण्याची एक शस्त्रक्रीया आहे. हे ऑपरेशन कशासाठी करायचे ? ज्या पेशंटला डायलिसिसची गरज पडते त्यांना हातामध्ये वेगाने रक्तप्रवाह असणाऱ्या नसा (Veins) तयार करण्यासाठी हे ऑपरेशन करावे लागते. डायलिसिससाठी नसेमध्ये जोरात रक्तप्रवाह असणे आवश्यक असते. तेवढा वेगवान प्रवाह हातातल्या नसांमध्ये कृत्रिमरित्या निर्माण करण्यासाठी हे ऑपरेशन करतात. हे ऑपरेशन केव्हा करावे ? १) डायलिसिसची गरज पडेल अशी शक्यता वाटल्यावर २) हाताच्या नसा इंजेक्शन / सलाईन देऊन खराब होण्याच्या आधी. ३) पेशंटची कंडीशन चांगली असताना ऑपरेशन करणे उत्तम. त्यामुळे ऑपरेशन यशस्वी होण्याची शक्यता वाढते. ४) ज्या पेशंटचे डायलिसिस सुरु आहे अशांनी Read More

कीलॉईड (Keloid)

लहानशा फोडामुळे कधीकधी छातीवर जाड व्रण तयार होतात. हे व्रण वाढू लागतात तसेच फार त्रासदायक असतात. CABG शस्त्रक्रीयेनंतर सुद्धा असे व्रण होतात. ह्या व्रणांचे ऑपरेशन करत नसतात. ऑपरेशन ने हे व्रण अजून वाढतात. स्टीरॉईड (Steroid) चे इंजेक्शन योग्य प्रमाणात त्या व्रणात देणे हा एकमेव उपाय आहे. हे इंजेक्शन पहिल्या वेळी देतांना दुखते. कधी कधी ३-३ आठवड्यानंतर परत इंजेक्शन घ्यावे लागते. तेव्हा कमी दुखते. इंजेक्शन अगदी योग्य खोलीवर देणे आवश्यक असते त्यामुळे हे केवळ प्लास्टीक सर्जन किंवा त्वचारोग तज्ञाकडूनच घ्यावे. इंजेक्शन ने या व्रणातील त्रास कमी होतो व वाढ थांबते. कधी कधी होमिओपॅथी औषधांमुळे या व्रणांना फायदा होवू शकतो. कीलॉईड प्रमाणे Read More

प्लास्टीक सर्जरी – समज गैरसमज

प्लास्टीक सर्जरी ह्या शाखेचा उगम भारतातच १५०० वर्षापूर्वी झाला तरीही अजून या शाखेविषयी फारच कमी जागृती आढळून येते. Plasty (प्लास्टी) या शब्दाचा अर्थ रिपेअर करणे, सुंदर बनवणे, नीट आकार देणे, नष्ट झालेले असल्यास पुन्हा बनवणे असा होतो. म्हणून या शस्त्रक्रियांना प्लास्टीक Plastic सर्जरी म्हणतात. (प्लास्टीक मेटरियलचा या शस्त्रक्रियेशी काहीही संबंध नाही.) अतिशय नाजुकपणे, बारकाईने, कौशल्याने, सौंदर्याचा दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून ह्या शस्त्रक्रीया केल्या जातात. खालील प्रकारच्या ऑपरेशनसाठी प्लास्टीक सर्जनची आवश्यकता असते.   सर्व ठिकाणच्या Crush injuries.  हाताच्या पंजाचे  सर्व ऑपरेशन.  चेहऱ्याचे सर्व ऑपरेशन्स, चेहऱ्याच्या हाडांचे व जबड्याचे फ्रॅक्चर   त्वचा, मांस इत्यादी नष्ट झाल्यास उदा. (१) अॅक्सीडेन्ट मुळे (२) भाजल्यामुळे (३) कॅन्सर झालेला Read More

हाताच्या ऑपरेशनमध्ये हात उंच ठेवण्याचे महत्व

बोटाचे किंवा हाताचे कुठलेही ऑपरेशन झाल्यानंतर हात उंच ठेवणे आवश्यक असते. यामुळे हाताला व बोटाला सूज येत नाही. हात खाली लटकवल्यास ऑपरेशन झालेल्या भागाला अतिशय सूज येते. ऑपरेशनचे टाके भरण्यासाठी हाताला सूज न येणे हे आवश्यक असते. चालता-फिरतांना पेशन्टने हात छाती किंवा पोटापाशी धरावा. झोपतांना हात भिंतीला टेकून ठेवावा. हाताचे ऑपरेशन झालेल्या पेशन्टने एखादवेळी औषध घ्यायला विसरले तर चालू शकेल परंतु हात खाली केलेला चालणार नाही. लहान मुलांना हत वर ठेवणे समजत नाही म्हणून त्यांना कोपराच्या वर पर्यंत प्लास्टर लावणे अत्यावश्यक असते

अपघात होवून चेहऱ्याला झालेल्या जखमा

रस्त्यावरील अपघात होवून चेहऱ्याला मार लागल्यावर खरचटे आणि इतर खोल जखमा होतात. या मधे खूप माती गेलेली असते आणि त्वचा चिरडलेल्या गेलेली असते. ह्याचा योग्य वेळी प्लास्टीक सर्जनच्या हातून उपचार करणे गरजेचे आहे. अन्यथा चिरडलेले मांस आणि मातीमुळे जखमा वेड्या-वाकड्या बऱ्या होऊन पुढे चालून चेहरा विद्रूप होतो आणि नंतर त्याच्या मध्ये सुधारणा करणे अशक्य होते.