पायाच्या ऑपरेशन नंतर घ्यावयाची काळजी

पायाच्या ऑपरेशन नंतर घ्यावयाची काळजी

पायाच्या कोणत्याही ऑपरेशन नंतर घोट्याचा योग्य व्यायाम करुन पायाच्या नसा आखडू न देणे अतिशय आवश्यक आहे. ज्या वेळेस रुग्णाला बऱ्याच काळ पर्यंत बेडरेस्ट दिल्या जाते त्या वेळेला घोट्याच्या मागील नसा आखडून घोट्याचा सांधा टाईट होतो, व पाऊल खालच्या दिशेने झुकते. एकदा पाऊल अशा पोजीशनमध्ये फिक्स झाले की, त्या पायावर उभे राहता येत नाही. हे टाळण्यासठी घोट्याच्या सांध्याची सतत हालचाल करत राहणे व पाऊल शक्य तितके वरच्या दिशेने ओढणे अतिशय आवश्यक आहे. यासाठी पाऊल दिवस रात्र काटकोनात राहील अशा रितीने भिंतीला टेकून ठेवावे व सतत ते जास्तीत जास्त वरच्या दिशेने लोटण्याचा प्रयत्न करा.
(Diagram 1) – असा ठेवू नये.
( Diagram 2) – असा ठेवावा.