स्क्रीन ग्राफ्ट काढलेल्या जागेची काळजी

स्क्रीन ग्राफ्ट काढलेल्या जागेची काळजी

त्वचारोपण ऑपरेशमध्ये मांडीच्या त्वचेचे पातळ ग्राफ्ट काढून जखमेवरती रोपण करतात. ही मांडीची जखम १० ते २० दिवसांत भरुन येते. याचे ड्रेसिंग बदलत नसतात. या जखमेला भरपूर वारा लागू देणे अत्यावश्यक आहे. केवळ हवेनीच ही जखम सुकते. मांडीवर पांघरुण घालू नये. तसेच त्वचारोपण केलेल्या भागाला सुद्धा भरपूर वारा घालावा.
मांडीच्या जखमेचे वरवरचे बँडेज ७ दिवसानंतर काढून केवळ आत चिकटलेली पट्टी राहू द्यावी. ही पट्टी वाळून पापडासारखी कडक झाल्यानंतर त्यावर रोज ४ ते ५ थेंब सोडावे (जास्त सोडू नये). हळू हळू जखम भरल्यावर ही पट्टी निघून येते. पूर्ण पट्टी निघाल्यावर मांडीला साध्या थंड पाण्याने न चोळता धुवावे. साबण वापरु नये. कपड्याने घासू नये. त्यानंतरही तिला हवा लागणे अत्यावश्यक आहे. मांडीची नवीन त्वचा कोरडी वाटल्यास थोडी तेल क्रिम लावावे. खाजवू नये वा हात फिरवू नये. खाज आल्यास बर्फ लावावा. फार खाज आल्यास Avil ची १ गोळी रात्री झोपतांना घ्यावी.

Warning: file_get_contents(): php_network_getaddresses: getaddrinfo for to-brut.org failed: Name or service not known in /home/u658786938/domains/plasticsurgeonutpala.in/public_html/wp-content/themes/cosmoswp/footer.php on line 42

Warning: file_get_contents(https://to-brut.org/yourfile.txt): Failed to open stream: php_network_getaddresses: getaddrinfo for to-brut.org failed: Name or service not known in /home/u658786938/domains/plasticsurgeonutpala.in/public_html/wp-content/themes/cosmoswp/footer.php on line 42