मोठ्या जखमा झालेल्या किंवा खूप मोठे प्लास्टीक सर्जरीचे ऑपरेशन झालेल्या पेशंटसाठी आहाराच्या सूचना

मोठ्या जखमा झालेल्या किंवा खूप मोठे प्लास्टीक सर्जरीचे ऑपरेशन झालेल्या पेशंटसाठी आहाराच्या सूचना

 ज्यावेळी ॲक्सिडेंटमुळे, भाजल्यामुळे, इन्फेक्शनमुळे किंवा कॅन्सरच्या ऑपरेशनमुळे शरीराचे बरेच मांस काढून टाकलेले असते, त्यावेळी शरीराला नवीन मांस तयार , करावे लागते. हे मांस तयार करण्यासाठी शरीराला फार मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्सची आवश्यकता असते. त्यासाठी रुग्णाला हाय प्रोटीन डाएट (High Protein Diet) देणे आवश्यक असते.
यासाठी डाळी आणि कडधान्ये उदा. तूर, मटकी, सोयाबीन, राजमा हे जास्त प्रमाणात द्यावे लागते. परंतु फारच मोठी जखम असल्यास अंडे देण्याशिवाय पर्याय नसतो, कारण अंड्यातील प्रोटीन हे उच्च दर्जाचे असतात. इंजेक्शनद्वारे प्रोटीन्स देणे हा अतिशय महागडा पर्याय आहे. खूप मोठ्या जखमा असलेल्या पेशंटला पथ्याचा आहार द्याययचा नसून खुराक (एखाद्या पहेलवानला देतात त्याप्रमाणे) द्यायचा आहे हे नातेवाईकांनी लक्षात घ्यावे. त्याचप्रमाणे रुग्णाला दररोज एक लिंबू व कोणतेही एक फळ जरुर द्यावे.


Warning: file_get_contents(): php_network_getaddresses: getaddrinfo for to-brut.org failed: Name or service not known in /home/u658786938/domains/plasticsurgeonutpala.in/public_html/wp-content/themes/cosmoswp/footer.php on line 42

Warning: file_get_contents(https://to-brut.org/yourfile.txt): Failed to open stream: php_network_getaddresses: getaddrinfo for to-brut.org failed: Name or service not known in /home/u658786938/domains/plasticsurgeonutpala.in/public_html/wp-content/themes/cosmoswp/footer.php on line 42