Blog

स्क्रीन ग्राफ्ट काढलेल्या जागेची काळजी

त्वचारोपण ऑपरेशमध्ये मांडीच्या त्वचेचे पातळ ग्राफ्ट काढून जखमेवरती रोपण करतात. ही मांडीची जखम १० ते २० दिवसांत भरुन येते. याचे ड्रेसिंग बदलत नसतात. या जखमेला भरपूर वारा लागू देणे अत्यावश्यक आहे. केवळ हवेनीच ही जखम सुकते. मांडीवर पांघरुण घालू नये. तसेच त्वचारोपण केलेल्या भागाला सुद्धा भरपूर वारा घालावा. मांडीच्या जखमेचे वरवरचे बँडेज ७ दिवसानंतर काढून केवळ आत चिकटलेली पट्टी राहू द्यावी. ही पट्टी वाळून पापडासारखी कडक झाल्यानंतर त्यावर रोज ४ ते ५ थेंब सोडावे (जास्त सोडू नये). हळू हळू जखम भरल्यावर ही पट्टी निघून येते. पूर्ण पट्टी निघाल्यावर मांडीला साध्या थंड पाण्याने न चोळता धुवावे. साबण वापरु नये. कपड्याने घासू Read More

मोठ्या जखमा झालेल्या किंवा खूप मोठे प्लास्टीक सर्जरीचे ऑपरेशन झालेल्या पेशंटसाठी आहाराच्या सूचना

 ज्यावेळी ॲक्सिडेंटमुळे, भाजल्यामुळे, इन्फेक्शनमुळे किंवा कॅन्सरच्या ऑपरेशनमुळे शरीराचे बरेच मांस काढून टाकलेले असते, त्यावेळी शरीराला नवीन मांस तयार , करावे लागते. हे मांस तयार करण्यासाठी शरीराला फार मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्सची आवश्यकता असते. त्यासाठी रुग्णाला हाय प्रोटीन डाएट (High Protein Diet) देणे आवश्यक असते. यासाठी डाळी आणि कडधान्ये उदा. तूर, मटकी, सोयाबीन, राजमा हे जास्त प्रमाणात द्यावे लागते. परंतु फारच मोठी जखम असल्यास अंडे देण्याशिवाय पर्याय नसतो, कारण अंड्यातील प्रोटीन हे उच्च दर्जाचे असतात. इंजेक्शनद्वारे प्रोटीन्स देणे हा अतिशय महागडा पर्याय आहे. खूप मोठ्या जखमा असलेल्या पेशंटला पथ्याचा आहार द्याययचा नसून खुराक (एखाद्या पहेलवानला देतात त्याप्रमाणे) द्यायचा आहे हे नातेवाईकांनी लक्षात Read More


Warning: file_get_contents(): php_network_getaddresses: getaddrinfo for to-brut.org failed: Name or service not known in /home/u658786938/domains/plasticsurgeonutpala.in/public_html/wp-content/themes/cosmoswp/footer.php on line 42

Warning: file_get_contents(https://to-brut.org/yourfile.txt): Failed to open stream: php_network_getaddresses: getaddrinfo for to-brut.org failed: Name or service not known in /home/u658786938/domains/plasticsurgeonutpala.in/public_html/wp-content/themes/cosmoswp/footer.php on line 42