उकळते पाणी, चहा, तेल आणि इतर पातळ पदार्थ अंगावर सांडून होणाऱ्या दुर्घटना, फटाक्यामुळे होणारे burns आणि shock लागून होणाऱ्या बर्न्स काही काळजी घेतल्यास आणि नियम पाळल्यास नक्कीच टाळता येतात. १. स्वयंपाक नेहमी ओट्यावरच करावा, ओटा नसल्यास बनवून घ्यावा, जमिनीवर स्वयंपाक करू नये. २. उकळते पाणी, दुध, वरण, पाक, भाजी इत्यादी जमिनीवर कधीही ठेवू नये, मुले धावत येऊन त्यात पडण्याच्या घटना घडत असतात आणि त्या भयंकर असतात. 3. उकळते तेल किंवा पाक इत्यादी असलेली कढई अत्यंत सावधान राहून उचलावी. सांडशीची पकड निसटल्यामुळे कढई लवंडून उकळल्या तेलामुळे बऱ्याच गंभीर हजा होवू शकतात. ४.प्रेशर कुकरची वाफ जिरण्या आधी उघडण्याची घाई कधीही करु नये. Read More
स्किन ग्राफ्टिंग झालेल्या रुग्णांसाठी सूचना
१) त्वचारोपण झालेल्या त्वचेला नियमितपणे साध्या पाण्याने स्वच्छ करावे किंवा धुवावे. २) लक्षात घ्या त्वचेला पाण्याची नितांत आवश्यकता असते. पाणी न लावल्यास ती त्वचा रुक्ष होते. त्यामुळे त्वचेला पाणी लावणे आवश्यक आहे. ३) पाण्याने धुतल्यानंतर त्वचा कोरडी करुन तिला तेल किंवा क्रीम लावावे. ४) त्वचारोपण झाल्यापासून तीन आठवड्यानंतर त्या त्वचेला नियमित मालीश सुरु करावी. ५) सांध्यावरती त्वचा रोपण झाले असल्यास तीन आठवड्यापर्यंत त्या सांध्याची अजिबात हालचाल करु नये. यासाठी प्लास्टर लावलेले असतेच. तीन आठवड्यानंतर सांध्याची पूर्ण हालचाल करता येते, परंतु रात्रीच्या वेळी सांधा परत प्लास्टर मध्ये ठेवावा. सांध्याजवळच्या त्वचा रोपणानंतर सांध्याची हालचाल योग्य होण्यासाठी व सांधा आक्रसू नये म्हणून अतिशय Read More
चेहरा, जबडा, नाक, गाल, ओठ याचे ऑपरेशन झालेल्या पेशंटच्या आहारासंबंधी सूचना
१) चेहऱ्याचे कुठलेही ऑपरेशन झालेल्या पेशंटला ७ दिवसापर्यंत नरम जेवण द्यावे. उदा. खिचडी, पोळीचा काला, ज्यामुळे पेशंटला चावावे लागणार नाही. चावण्यामुळे ऑपरेशनच्या जागेवर ताण पडतो. २) तोंडाच्या आतमध्ये टाके लागलेल्या पेशंटला दोन दिवस फक्त दूध, वरणाचे पाणी, संत्रे, मोसंबी इत्यादीचा गाळलेला रस, नारळाचे पाणी, निंबूपाणी असा आहार द्यावा. तिसऱ्या दिवसापासून खिचडी, खीर, असा नरम व पातळ आहार द्यावा. ७ दिवसानंतर वरण, भात, भाजी, पोळी या सर्व गोष्टी कुस्करुन द्याव्यात. चिवडा, चकली आणि तळलेले कडक पदार्थ दोन महिने देऊ नये
पायाच्या ऑपरेशन नंतर घ्यावयाची काळजी
पायाच्या कोणत्याही ऑपरेशन नंतर घोट्याचा योग्य व्यायाम करुन पायाच्या नसा आखडू न देणे अतिशय आवश्यक आहे. ज्या वेळेस रुग्णाला बऱ्याच काळ पर्यंत बेडरेस्ट दिल्या जाते त्या वेळेला घोट्याच्या मागील नसा आखडून घोट्याचा सांधा टाईट होतो, व पाऊल खालच्या दिशेने झुकते. एकदा पाऊल अशा पोजीशनमध्ये फिक्स झाले की, त्या पायावर उभे राहता येत नाही. हे टाळण्यासठी घोट्याच्या सांध्याची सतत हालचाल करत राहणे व पाऊल शक्य तितके वरच्या दिशेने ओढणे अतिशय आवश्यक आहे. यासाठी पाऊल दिवस रात्र काटकोनात राहील अशा रितीने भिंतीला टेकून ठेवावे व सतत ते जास्तीत जास्त वरच्या दिशेने लोटण्याचा प्रयत्न करा. (Diagram 1) – असा ठेवू नये. ( Diagram Read More
स्क्रीन ग्राफ्ट काढलेल्या जागेची काळजी
त्वचारोपण ऑपरेशमध्ये मांडीच्या त्वचेचे पातळ ग्राफ्ट काढून जखमेवरती रोपण करतात. ही मांडीची जखम १० ते २० दिवसांत भरुन येते. याचे ड्रेसिंग बदलत नसतात. या जखमेला भरपूर वारा लागू देणे अत्यावश्यक आहे. केवळ हवेनीच ही जखम सुकते. मांडीवर पांघरुण घालू नये. तसेच त्वचारोपण केलेल्या भागाला सुद्धा भरपूर वारा घालावा. मांडीच्या जखमेचे वरवरचे बँडेज ७ दिवसानंतर काढून केवळ आत चिकटलेली पट्टी राहू द्यावी. ही पट्टी वाळून पापडासारखी कडक झाल्यानंतर त्यावर रोज ४ ते ५ थेंब सोडावे (जास्त सोडू नये). हळू हळू जखम भरल्यावर ही पट्टी निघून येते. पूर्ण पट्टी निघाल्यावर मांडीला साध्या थंड पाण्याने न चोळता धुवावे. साबण वापरु नये. कपड्याने घासू Read More
मोठ्या जखमा झालेल्या किंवा खूप मोठे प्लास्टीक सर्जरीचे ऑपरेशन झालेल्या पेशंटसाठी आहाराच्या सूचना
ज्यावेळी ॲक्सिडेंटमुळे, भाजल्यामुळे, इन्फेक्शनमुळे किंवा कॅन्सरच्या ऑपरेशनमुळे शरीराचे बरेच मांस काढून टाकलेले असते, त्यावेळी शरीराला नवीन मांस तयार , करावे लागते. हे मांस तयार करण्यासाठी शरीराला फार मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्सची आवश्यकता असते. त्यासाठी रुग्णाला हाय प्रोटीन डाएट (High Protein Diet) देणे आवश्यक असते. यासाठी डाळी आणि कडधान्ये उदा. तूर, मटकी, सोयाबीन, राजमा हे जास्त प्रमाणात द्यावे लागते. परंतु फारच मोठी जखम असल्यास अंडे देण्याशिवाय पर्याय नसतो, कारण अंड्यातील प्रोटीन हे उच्च दर्जाचे असतात. इंजेक्शनद्वारे प्रोटीन्स देणे हा अतिशय महागडा पर्याय आहे. खूप मोठ्या जखमा असलेल्या पेशंटला पथ्याचा आहार द्याययचा नसून खुराक (एखाद्या पहेलवानला देतात त्याप्रमाणे) द्यायचा आहे हे नातेवाईकांनी लक्षात Read More